माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची प्रमुख उपस्थिती



काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात, आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन : वैभव नाईक
कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाली. याप्रसंगी जि. प. व पं. स. निवडणुकीत विजयी झालेल्या आणि निवडणुकीत लढून पराभूत झालेल्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, ता.संघटक बबन बोभाटे, ता.संघटक सचिन कदम, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळू पालव, महेश सावंत, शहर प्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, नूतन जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर, जि.प.सदस्य रुपेश पावसकर, माजी उपसभापती जयभारत पालव, बाजीराव झेंडे, महिला ता. प्र. स्नेहा दळवी, नूतन पं.स. सदस्य योगेश धुरी, बाळा कांदळकर, अर्चना बंगे, ममता राऊळ, दीप्ती नाईक, अतुल बंगे, शेखर गावडे, अवधूत मालणकर, नरेंद्र राणे, मंगेश बांदेकर, सचिन भिसे, पप्पू म्हाडेश्वर, दीपक आंगणे, योगेश गोडे, राजू घाडीगावकर, संजना परब, महादेव परब, आणा मेस्त्री, योगिता पवार, समृध्दी कदम, नीलिमा वालावलकर, अशपाक कुडाळकर, तुळशीदास पिंगुळकर, सचिन धुरी, आप्पा मांजरेकर, नितीन सावंत, निलेश सामंत, महेश वेळकर, सचिन गावडे, सागर पारकर, पूजा राऊळ, सुभाष परब, बंड्या कोरगावकर, अमित राणे, कपिल म्हापसेकर यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. पं.स. निवडणुकीत २५ सीट बिनविरोध झाल्या. आपल्या मतदार संघातील उमेदवारांनाही लाखो रुपयांचे आमिष देऊन त्यांना फोडण्याचे आणि दडपण्याचे प्रयत्न झाले. परंतु आपले सर्वजण शिवसेना पक्षाशी प्रामाणिक राहिले. काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली आणि मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. त्याबद्दल शिवसेनेच्या सर्व लढवय्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. लढणाऱ्यांचा विजय होतो हा इतिहास आहे. त्याची नक्कीच पुनरावृत्ती होईल. काहींचा फार कमी मतांनी पराभव झाला, पराभवाने कोणीही खचून जाऊ नये. महायुतीची केंद्रात, राज्यात सत्ता आहे तरी या निवडणुकीत मतदारसंघातील ५० हजार लोकांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. सत्ताधारी आमदार असलेल्या पक्षाला आपल्यापेक्षा केवळ १ हजार मतेच जास्त मिळाली. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याचा मी शब्द दिला होता. त्याप्रमाणे आपल्या पाठीशी राहण्याचे काम मी केले. यापुढेही मी आपल्या पाठीशी राहणार आहे. जिल्ह्यातील जनता आज अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देताना शिवसेनेने जिल्ह्यात एकत्रित काम करण्याची गरज आहे. त्यासाठी लवकरच आम्ही उद्धवजींची भेट घेणार आहोत. आपण सर्वांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठविला पाहिजे. जे सदस्य निवडून आले आहेत त्यांनी सभागृहात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना तीव्र विरोध केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, शिवसेना पक्षाने अनेक वेळा विरोधी पक्षात राहून काम केले आहे. आपण सर्व उमेदवारांनी निवडणुकीत दिलेली फाईट उल्लेखनीय आहे. यापुढेही तुम्ही सर्वांनी ताठ मानेने लढलं पाहिजे, लोकसंपर्क ठेवला पाहिजे, लोकांची छोटी मोठी कामे केली पाहिजेत. आज जिल्हयात आरोग्य सुविधा, अवैध धंदे, खड्डेमय रस्ते, बंद केल्या जाणाऱ्या शाळा, आंबा- काजूचे नुकसान असे अनेक प्रश्न आहेत. सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे जनता सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. त्या जनतेचा आवाज आपण बनले पाहिजे. येथील स्थानिक आमदार विधानसभा सभागृहात वेगळं बोलतात आणि जिल्ह्यात येऊन दुसरं बोलतात. एकाच घरात पालकमंत्री, सत्ताधारी खासदार,आमदार असताना जिल्ह्यातील प्रश्न का सुटत नाहीत हा खरा सवाल आहे. जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेक करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे असे आमदार लाभले हे या मतदारसंघाचे दुदैव आहे. आमदार, खासदार आपले असतील तर कार्यकर्त्यांना बळ मिळते. त्यामुळे पुढील तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. त्यासाठी वैभव नाईक आपल्या पाठीशी आहेत.आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

Subscribe to my channel




