
सरोजताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी : खा. राणे
मसुरे : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देत परब कुटुंबीयांचे सांत्वन केले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सरोज परब यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले, “सरोजताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या सरोजताईंची उणीव आम्हाला निश्चितच भासणार आहे. आम्ही परब कुटुंबीयांच्या या दुःखात सहभागी आहोत.”
खासदार नारायण राणे व सौ. नीलमताई राणे यांनी सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी तथा मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुलगा राहुल परब यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. सदस्य क्षमा हडकर, उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, डॉ. सुधीर मेहेंदळे, सूर्यकांत फणसेकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, संदीप हडकर, राजेश गावकर, पंढरीनाथ मसुरकर, जगदीश चव्हाण, अजय प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, रोहेश गावकर, गणेश परब, पुरुषोत्तम शिंगरे आदी उपस्थित होते.







Subscribe to my channel






