युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी केली नियुक्ती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र


मालवण | कुणाल मांजरेकर
युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्त प्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती केली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले.
ऋषिकेश सामंत यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष श्री पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली शिवसेना पक्षाच्या “युवासेना मालवण शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निशय पालेकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड, तालुका संघटना प्रमुख शाम वाक्कर, शहर सचिव चिन्मय तांडेल, कुडाळ मालवण विधानसभा युवासेना अध्यक्ष प्रीतम गावडे, शहर प्रमुख आनंद पराडकर, उपतालुका प्रमुख सिद्धेश मसुरकर, तालुका संघटक अमोल मुळीक, उपतालुका प्रमुख संदेश वेतुरेकर, विभागप्रमुख धनंजय परब, सिद्धेश खेडेकर, राजू चव्हाण, जीवन प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Subscribe to my channel




