मालवण : शहरातील संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथील श्री देवी भैरवी देवालयाचा १७ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजेने होणार असून सकाळी ११ वाजता श्री देवी भैरवी सभामंडपाचे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता “स्वरसंध्या” संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री ८ वाजता श्री देवी भुमिकाई प्रसादिक भजन मंडळाचे भजन होणार असून रात्री १० वाजता श्री बोडेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, बांदामार्फत “भवानी शंकर” हे पारंपरिक दशावतारी नाटक सादर करण्यात येणार आहे.
या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री विजय सिताराम चव्हाण यांनी केले आहे.