उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिथुन मालंडकर यांची निवड ; संस्था कार्यालयात पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न
मालवण : मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र ऊर्फ हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले.
संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत संस्था कार्यालयात झाली. संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी हरी खोबरेकर व शंकर वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पदासाठी निवडणूक झाली. यात हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले. त्यामुळे संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून हरी खोबरेकर यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केली. उपाध्यक्ष पदासाठी मिथुन मालंडकर व प्रमिला मोरजे यांच्यात लढत झाली. यात मिथुन मालंडकर विजयी झाले. संस्थेचे संचालक असे- हरिश्चंद्र खोबरेकर, पृथ्वीराज जोगी, जयवंत लोणे, मिथुन मालंडकर, नरेश हुले, विष्णू मोंडकर, दिनेश माणगावकर, शंकर वाघ, रश्मीन रोगे, सेजल परब, प्रमिला मोरजे