मालवण बाजारपेठेतील धोकादायक इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष ; स्लॅब कोसळू लागल्याने स्थानिक भयग्रस्त

जागा मालकाकडून नगरपालिकेच्या मागच्या वर्षीच्या नोटीसीला “केराची टोपली”

उद्या दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण? मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदानंद कमलाकर मयेकर यांच्या मालकीची घर नं. १८९९ ही इमारत धोकादायक बनली असून या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. या इमारतीला वर्षभरापूर्वी नगरपालिकेने नोटीस बजावून इमारतीचा वापर थांबवण्याच्या सूचना दिल्या असताना देखील याचा वापर सुरु असून पालिकेचे येथे दुर्लक्ष होत आहे. आता येथील स्लॅब कोसळू लागल्याने उद्या येथे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.

बाजारपेठेतील सदानंद मयेकर यांच्या मालकीच्या या इमारतीत पालव टेलर्स हे दुकान आणि वरच्या मजल्यावर दोन भाडेकरू आहेत. हे भाडेकरू येथे राहत नाहीत. हीइमारत धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी मालवण नगरपालिकेने सदानंद मयेकर यांना १५ मे २०२५ ला नोटीस पाठवून या इमारतीचा वापर थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या नोटीसीला केराची टोपली दाखवण्यात आली असून इमारतीचा वापर बिनदिक्कतपणे सुरु आहे.

नगरपालिकेच्या नोटीसी नंतर देखील या इमारतीचा वापर सुरूच असून नगरपालिकेचे याठिकाणी दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता या इमारतीचा स्लॅब कोसळण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री ९, वाजता याठिकाणचा स्लॅब कोसळल्याने स्थानिकांमध्ये घब राट निर्माण झाली आहे. मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी याठिकाणची पाहणी करुन ही धोकादायक इमारत तात्काळ बंद करुन याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करुन घेण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!