माणगांव खोऱ्यात उबाठा गटाला पुन्हा खिंडार ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार : आमदार निलेश राणेंची घोषणा : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक

माणगांव : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरित होऊन माणगांव मधील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा, हे दाखवून देऊ, असा शब्द निलेश राणे यांनी दिला. माझ्या प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे, असा विकास येथे करणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार राणे यांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे कौतुक करताना असा जिल्हाप्रमुख महाराष्ट्रात बघितला नाही, असे ते म्हणाले.

माणगांव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे, वाडोस, कांदोळी, महादेवाचे केरवडे, निळेली आदी गावातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, संदीप कुडतरकर, संजय पडते, बाळू कुबल, प्राजक्ता शिरवलकर, सौ. खोचरे, मथुरा राऊळ, दीपक पाटकर, रत्नाकर जोशी, दिनेश साळगावकर, दीपक नारकर, विनायक राणे, अरविंद करलकर, दिनेश वारंग, दत्ता कोरगावकर, दिनेश शिंदे सचिन धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त प्रक्ष प्रवेश माणगाव खोऱ्यात होत असून याचे सर्व श्रेय जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना जाते. त्यामुळेच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दत्ता सामंत यांच्यासारखा जिल्हाप्रमुख कुठे मी बघितला नाही. त्यांनी मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे साथ दिली आहे. संघटना मोठी झाली पाहिजे यासाठी नेहमी झटणारे आणि अनेक विकास कामाचा धडाका लावणारे ते जिल्हाप्रमुख असून त्यांनी दिलेला शब्द मी पडू देणार नाही. त्यांचा प्रत्येक शब्द पूर्ण करणार आहे. गेल्या दहा वर्षात माणगाव खोऱ्यातील वाडी, रस्ते, मुख्य रस्ते आदी कामाबाबत माणगाव खोरे पिछाडीवर आहे. मी कुठल्याही विकास कामात माणगाव खोऱ्यातील लोकांना न्याय देणार आहे. माणगाव खोऱ्यातील ७० लाखाची विकास कामे डी.पी.डी.सी च्या माध्यमातून झाली असून प्रस्तावित चार कोटी रुपये, १३ कोटीचे पूल, तसेच वीज वितरण सब स्टेशनसाठी डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात विषय अग्रक्रमाने मांडून त्यासाठी १३ कोटीची तरतूद करावी लागणार असल्याचे सांगितले. तर येथील लोकांना रोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकल्प किंवा योजना राबविणार आहे. आज आमच्या शिवसेनेत येणाऱ्यांना आम्ही परके न समजता ते आमच्या कुटुंबातीलच आहेत. तुमच्या सर्व विकासकामांना अग्रक्रम देणार असून अंजीवडे घाट रस्त्याचा डीपीआर बनवत असून घोडगे सोनवडे घाट रस्ता असे मिळून दोन्ही घाट रस्त्याचा शुभारंभ लवकरात लवकर थाटामाटात संपन्न करू असे सांगितले. तसेच आकारिपड जमीन प्रश्नाबाबत 1760 लाभार्थ्यांना जमिनी मिळण्याबाबत कॅबिनेट मंत्री बावनकुळे व राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी पाठपुरावा केला आहे. त्याप्रमाणे तीन महिन्यात याबाबत लाभार्थ्यांना जमिनी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. तसेच वनविभागाच्या ताब्यात असलेल्या आकारिपड जमिनी बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. 

यावेळी प्रवेशकर्ते गटाचे विभागप्रमुख रामचंद्र धुरी यांनी आपण गेली पंधरा वर्षे ठाकरेंच्या शिवसेनेत निष्ठेने काम केले असून येथील विकास कामे होत नसल्याने आपण शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. असे सांगितले तसेच आपण यानंतर शिवसेनेत एकनिष्ठ राहणार असून कुठल्याही पदाची अपेक्षा धरणार नाही, असे सांगितले.

यावेळी काशीराम खराडे, कृष्णा दळवी, पदु डोईफोडे युवा सेनाप्रमुख विशाल धुरी, बापू डोईफोडे, अरुण सावंत, विठ्ठल जाधव, जयराम डोईफोडे, रुपेश रेमूळकर, रमेश खरात, सौ ममता धुरी, उपविभाग प्रमुख प्रशांत माडगूळ, शाखाप्रमुख किरण म्हाडगुत, दीपक म्हाडगुत, प्रदीप म्हाडगुत, भागोजी वरक, बाबा खरात, संग्राम थोकते, विठू वरक कांदुळी येथील कृष्णा साटम, रवी साटम, रमेश साटम, सूर्यकांत पवार, विठ्ठल सावंत मोहन सावंत, सुरेश सावंत, रमेश सावंत, निळेली येथीलपिंटू रेगडे, सुरेश परब, कांता परब, मुला जंगले, अनंत कोकरे, नितेश परब विकी परब, राजन धुरी, अशोक परब, सदू रेडगे, बलराम रेडगे, तुकाराम रेडगे, मंगेश रेडगे भाई पालकर उपवडे येथील सदानंद गवस, महादेव राऊत, कृष्णा गवस, राजाराम राऊत, दशरथ राऊळ, गोपाळ सावंत, मोहन धुरी मंगेश निकम, महादेवाचे खेरवडे येथील भास्कर केरवडेकर, नरेंद्र वेंगुर्लेकर, शंभू घाडी, सुदेश राणे, संतोष केरवडेकर, विद्या केरवडेकर, सरस्वती केरवडेकर, कृष्णा परब, निलेश परब, निधी परब, सोनू कोठेकर, सुनील राणे यासह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित प्रवेश कर्त्यांचे आ. निलेश राणे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कोरगावकर, प्रस्ताविक दिलीप सावंत यांनी केले.

error: Content is protected !!