Akkalkot | माजी गृहमंत्री, आमदार अनिल देशमुख स्वामींच्या चरणी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या सेवा कार्याचे केले कौतुक

चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आमदार अनिल देशमुख यांचा सपत्नीक सत्कार

अक्कलकोट : राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल नागपूरचे आमदार अनिल देशमुख यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार अनिल देशमुख यांचा सपत्निक व त्यांच्या समवेत असलेले विशाल कदम यांचाश्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.

श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरविण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत. ते प्रत्यक्ष वटवृक्षाखाली उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत व सुलभ स्वामींचे दर्शन कसे मिळेल याचे अत्यंत तळमळीने नियोजन करित असतात. महेश इंगळे यांच्या या कार्याच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत यावेळी आमदार अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रथमेश इंगळे, माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!