राजन तेलींची जिल्हा बँकेवर टीका ; आ. निलेश राणेंनी तात्काळ फटकारलं…

अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या सुरु असलेल्या प्रगतीचं कौतुक

मालवण : शिवसेनेचे नेते, माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर सडकून टीका केल्यावंगी घटना सोमवारी घडली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी तात्काळ एक्स पोस्ट करत राजन तेली यांना नाव न घेता फटकारलं आहे. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या सुरु असलेल्या कामाचं कौतुक करतानाच आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो. पण टीका करायची काही गरज नाही, असे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. ही बँक गेली अनेक वर्षे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे. राज्यस्तरावरील विविध पूरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळवले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेती पूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे, असेही आ. निलेश राणे यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!