‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कडून रविना रेवंडकर हिला आर्थिक मदतीचा हात

मालवण दांडी येथील रविना रविंद्र रेवंडकर यांच्यावर कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत उपचार

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील दांडी मोरेश्वरवाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४ x २५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रीलस्टार अंकिता वालावलकर यांच्यावतीने त्यांना १० हजारांची रुपये मदत सौ. रेवंडकर यांचे पती रविंद्र रेवंडकर यांच्याकडे चेक स्वरूपात देण्यात आली आहे.

श्री. रेवंडकर हे मोलमजुरीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी रविना रविंद्र रेवंडकर (वय ४५ वर्ष) यांच्या पोटामध्ये २४x२५ mm चा ट्यूमर आहे आणि फुफुसामध्ये पाणी झाले आहे. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील डॉ. बिरमोळे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ऑपरेशनला येणारा खर्च खूप जास्त असून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!