ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर


भारतातील पहिल्या विकासाच्या “एआय” मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दौरा
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आगळावेगळा बनवण्यासाठी सातत्याने धडपड सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून या जिल्ह्याने देशातील पहिला “एआय” जिल्हा म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. यातून जनतेच्या रेंगाळलेल्या कामान नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालना देण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न आहे. ना. नितेश राणे यांच्या या कल्पकतेची केंद्रीय निती आयोगाने दखल घेतली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य एआय सिंधुदुर्गच्या विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत.
ए आय सिंधुदुर्गच्या निमित्ताने मार्व्हलने एक यशस्वी मॉडेल विकसित केले आहे, जे लवकरच देशभरात स्वीकारले जाईल. हे एआय सिंधुदुर्ग मॉडेल भारतातील पहिले असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल ना. नितेश राणे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार केलेले हे मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य या भेटीत स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचा सखोल आढावा घेणार आहेत. या भेटीमुळे सिंधुदुर्गाचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरात पोहोचणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रवासात एक नवे पर्व सुरू होणार आहे.

Subscribe to my channel




