वायरी लुडबेवाडा येथील महिलांच्या आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
७० महिलांची तपासणी ; आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील वायरी लुडबेवाडा येथे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षांवरील महिलांच्या आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० महिलांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने गुरुवारी सकाळच्या सत्रात आप्पा लुडबे यांच्या निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या वतीने सर्व महिलांना आरोग्य कार्ड देण्यात आहे. या शिबीरात बी.पी. शुगर, हिमोग्लोबिन, थायरॉईड तपासणी करण्यात आली. यावेळी आप्पा लुडबे यांच्यासह आयुषच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भार्वी आवळे, संतोषी देसाई, शीतल तेली, एस.एस. वेंगुर्लेकर, सुविधा प्रभू, पूजा चव्हाण, अंगणवाडी सेविका अनुराधा पाटकर, कांचन परब, प्राची पावसकर आदी कर्मचारी उपस्थित होते.