शिरोडा वेळागर येथील दुर्घटनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला शोक

स्थानिक प्रशासनाच्या मी संपर्कात ; अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन.

सिंधुदुुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनारी आठ पर्यटक बुडाल्याच्या घटनेबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नितेश राणे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

शिरोडा-वेळागर समुद्रात काही पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखद प्रसंगी मृत कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाच्या मी संपर्कात असून त्यांच्याकडून हरवलेल्या पर्यटकांची शोधमोहीम सुरू आहे. हरवलेल्यांचा लवकरात लवकर शोध लागून ते सुरक्षित परतावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन, असे नितेश राणे यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!