
आमदार निलेश राणे यांचा गंभीर आरोप : दोन दिवसात सविस्तर पत्रकार परिषद घेणार
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक श्री दहीकर देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार. दोन दिवसांनी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे’, अशी पोस्ट आमदार राणे यांनी आपल्या ‘एक्स’ समाज माध्यमावर केली आहे. त्यामुळे दोन दिवसात आमदार राणे नेमका कोणता खुलासा करणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे..








Subscribe to my channel






