शिवसेनेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता वराडकर उद्या पदभार स्वीकारणार

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या सौ. ममता मनमोहन वराडकर या मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष बनल्या असून आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण नगरपरिषद येथे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना नगरसेवक दिपक पाटकर, नीना मुंबरकर, पुनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!