जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; संघटनवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन
कणकवली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुखपदी सावडाव येथील रविंद्र नामदेव खांदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक आणि कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते रविंद्र खांदारे यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन रविंद्र खांदारे यांना करण्यात आले. जानवली जिल्हा परिषद विभागातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल खांदारे यांचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग नाईक, वैभव सावंत, नयना सावंत, सुरेश मोरे, उल्हास गावकर, अरविंद वारंग, संदीप वारंग, विजय राणे, विजय कदम, तुकाराम सावंत, तेजस सावंत, रमाकांत देऊलकर, संतोष तेली, अक्षय कदम, रचना खांदारे आदी उपस्थित होते.