शिवसेनेकडून कुडाळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर ; आ. निलेश राणेंच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल यांच्यासह दिग्गजांना संधी ; रुपेश कानडे यांचा शिवसेनेत प्रवेश, माणगांव जि. प. मधून उमेदवारी

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ येथील रुपेश कानडे यांनी मंगळवारी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर माणगांव जिल्हा परिषद गटातून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते या उमेदवारांना ए बी फॉर्म चे वाटप करण्यात आले. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे.

शिवसेनेचे उमेदवार पुढीलप्रमाणे – सौ. दीपलक्ष्मी सुशांत पडते (जिल्हा परिषद आंब्रड), नागेश नारायण आईर (जिल्हा परिषद वेताळ बांबर्डे), तुकाराम चंद्रकांत उर्फ दादा साईल ( जिल्हा परिषद पावशी), केशव रमेश नारकर ( जिल्हा परिषद घावनळे), रुपेश रवींद्र कानडे (जिल्हा परिषद माणगांव), संजय धोंडदेव पडते ( जिल्हा परिषद नेरूर)

पंचायत समिती उमेदवार – कौशल दत्ताराम जोशी (माणगांव), सौ. दिव्यांनी धाकू खरात (गोठोस), सौ. अश्विनी उदय सावंत (वेताळ बांबर्डे), निखिल कांदळगावकर ( डिगस), बाळू मडव (जांभवडे), बापू पाताडे (कसाल), सौ. निता भास्कर नाईक ( नेरूर), सौ. प्रियांका समीर जळवी ( पाट), मिलिंद नाईक (साळगाव)

error: Content is protected !!