धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड कोसळले : वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडीत

माजी नगरसेवक यतीन खोत यांची तत्परता ; स्थानिक नागरिक, पालिका व वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वखर्चातून झाड हटवून वीज पुरवठा सुरळीत

मालवण : मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्त्यावर धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. झाड कोसळून वीज वाहिन्या तुटल्याने वीज कंपनीचे नुकसान झाले. सोबत सर्व परिसराची विद्युत पुरवठा दुवसभर खंडित राहिला. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चाने झाड हटविण्यात आले. रेस्क्यूचे सदस्य स्वप्नील परुळेकर, स्थानिक नागरिक, वीज कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने हे झाड हटविण्यात आले.

यावेळी मदत कार्यात शिल्पा खोत, अमन गोडावले, गणेश चेंदवणकर, श्री. पुजारे, अनिकेत आचरेकर, सुनील बागवे, सर्वेश बागवे, हेमंत जोशी, रवि तोंडवळकर, महेश कांबळी, सदाशिव सावंत, दिलीप पवार, आशिष खोत, अमित खोत तसेच वीज कर्मचारी श्री. गोलतकर, श्री. बांदेकर, श्री. लुडबे आदी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!