नविन विहीर खोदकामासाठी २ गुंठे जमीनीसाठी केली ८ लाख रुपयांची आर्थिक मदत ; हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार


अक्कलकोट : तालुक्यातील हसापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये भीषण पाणी टंचाई भासत होती. यंदाचा पावसाळा समाधानकारक होवूनही अक्कलकोट शहरासारखेच हसापूर गावातही पाणी प्रश्न कायम आहे. हसापूर मधील ही पाणी टंचाई
व पाणी प्रश्न लक्षात घेवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वत: पुढाकार घेवून यंदाच्या विजयादशमीच्या मुहार्तावर नविन विहीर खोदकामासाठी २ गुंठे जमिन घेऊन देण्यासाठी ८ लाख रुपयांची वैयक्तीकरित्या आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते जयवंत जयनंदलाल चव्हाण यांचे मातोश्री रुक्मिणीबाई जयनंदलाल चव्हाण यांना तात्काळ सुपूर्द करण्यात आली. महेश इंगळे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे हसापूर ग्रामस्थांच्या वतीने महेश इंगळे यांच्या प्रती कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या मदतीमुळे हसापूर गावचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
महेश इंगळे यांच्या या मदतीने ग्रामस्थ अत्यंत भारावले असून त्यांच्या या मदती प्रित्यर्थ व विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने महेश इंगळे व प्रथमेश महेश इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी हसापूर ग्रामपंचायत सरपंच कामाठी, उपसरपंच गौतम घटकाबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी, मीनाबाई शिंदे, कृष्णाबाई सदाफुले, सायनत्राबाई घटकाबळे, माजी सरपंच पाटील, रामलिंगया स्वामी, शीतापती कामाठी, राजकुमार कामाठी, महेश कामाठी, रोहित जाधव आदींसह हसापूरचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी यांनी केले, तर आभार उपसरपंच गौतम घटकांबळे यांनी मानले.

Subscribe to my channel




