कुडाळ शहर गणेश सजावट स्पर्धेत साई तळवणेकर प्रथम!

सत्यवान राऊळ द्वितीय तर दीपक पाटील तृतीय : आमदार निलेश राणे पुरस्कृत स्पर्धेचा निकाल जाहीर

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेत कुडाळ शहरातून साई तळवणेकर (वॉर्ड क्र. १३) यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून द्वितीय क्रमांक सत्यवान (शार्दुल) राऊळ (वॉर्ड क्र. ५), तर तृतीय क्रमांक दीपक पाटील (वॉर्ड क्र. १३) यांनी पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक राजाराम गडेकर (वॉर्ड क्र. १), तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्रदीप राऊळ (वॉर्ड क्र. १३) यांनी मिळवला.

कुडाळ शहरात गेल्या दोन वर्षांपासून आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे परीक्षण महेश राऊळ व रजनीकांत कदम यांनी केले. स्पर्धा प्रथम वॉर्डनिहाय घेण्यात आली. प्रत्येक वॉर्डातील विजेत्यांमधून शहरस्तरावरील प्रथम तीन तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले.

वॉर्डनिहाय निकाल – (प्रथम तीन क्रमांक) वॉर्ड क्र. १ – राजाराम गडेकर, संदीप जळवी, शुभम आकेरकर. वॉर्ड क्र. २ अरविंद मेस्त्री, राहुल मेस्त्री, विष्णू कुडाळकर. वॉर्ड क्र. ३ प्रसाद मालवणकर, साईनाथ नेमळेकर, मयुरेश आळवे. वॉर्ड क्र. ४ भूषण मठकर, जयराम डिगसकर, गिरीश काणेकर. वॉर्ड क्र. ५ सत्यवान (शार्दुल) राऊळ, प्रतीक राऊळ, रुपेश कुडाळकर. वॉर्ड क्र. ६ आबा धडाम, बापू सावंत, कुणाल शिरसाट. वॉर्ड क्र. ७ अक्षय तेंडुलकर, सहदेव कुडाळकर, वैभव आजगावकर. वॉर्ड क्र. ८ सिद्धेश सावंत, गोविंद सावंत, प्रदीप परब. वॉर्ड क्र. ९ राकेश कांदे, तन्मय कुणकावळेकर.

वॉर्ड क्र. १० तेजस पाटकर, प्रसाद माळकर, राज गवळी. वॉर्ड क्र. ११ विराज हार्दिक सावंत, नागेश राणे, अमेय कुडाळकर. वॉर्ड क्र. १२ गजानन कुडाळकर, बाळा कुडाळकर, संजू चिंदरकर. वॉर्ड क्र. १३ साई तळवणेकर, दीपक पाटील, प्रदीप राऊळ. वॉर्ड क्र. १४ दीपलक्ष्मी पडते, राजेश पडते, हर्षवर्धन जोशी. वॉर्ड क्र. १५ शंकर कुंभार, विठोबा कुंभार, धीरज कुंभार. वॉर्ड क्र. १६ कौस्तुभ दाभोलकर, समीर हलदणकर, महेश कुंभार. वॉर्ड क्र. १७ डॉ. सुधीर राणे, चेतन परब, महादेव बोभाटे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेमुळे कुडाळ शहरातील विविध वॉर्डांमध्ये गणेश सजावटीतून सर्जनशीलता, कलात्मकता आणि उत्सवातील चैतन्याला प्रोत्साहन मिळाले.

error: Content is protected !!