अपघातानंतर पेट्रोल- डिझेल भरलेल्या टँकरने घेतला पेट

आगीत टँकर जळून खाक ; मालवण – कसाल महामार्गावर सावरवाड येथे दुर्घटना

टॅंकर मध्ये तब्बल १२ हजार लीटर पेट्रोल- डिझेल ; सुदैवाने जीवितहानी नाही, चालकाला किरकोळ दुखापत

कुणाल मांजरेकर : मालवण

सांगली येथून चौकेच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल – डिझेल घेऊन येणारा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातानंतर या टँकरने पेट घेतला. या दुर्घटनेत टँकर पूर्णतः जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मालवण – कसाल महामार्गावर सावरवाड येथे घडली. पहाटेपर्यंत आगीचा भडका कायम असल्याने महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती. टँकरमध्ये ६ हजार लीटर पेट्रोल आणि ६ हजार लीटर डिझेल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य नाही. दुर्घटनेत टॅंकर जळून खाक झाला. अपघातग्रस्त टॅंकर मध्ये चालक आणि क्लिनर होते. यातील चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे.

चौके येथील भगवती पेट्रोल पंपाचा टॅंकर (MH07- P 1212) हा सांगलीहून चौके येथे पेट्रोल आणि डिझेल घेऊन येत होता. मालवण सावरवाड गणेश मंदिर येथे या टॅंकरला अपघात होत हा टॅंकर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी टँन्करमध्ये ६००० लीटर पेट्रोल तर ६००० लीटर डिझेल असल्याने शॉर्टसर्कीट झाल्याने आगीचा भडका उडाला व टॅंकरने पेट घेतला. यावेळी मोठा स्फोट झाल्याचे बोलले जाते. सुदैवाने चालकाच्या पायाला दुखापत होत स्फोट होण्याच्या आत तो बाहेर आल्याने बालंबाल बचावला. मात्र टॅंकरचे मोठे नुकसान झाले असून तो जळून खाक झाला. या अपघातामुळे चौके येथील पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!