जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच !

आमदार नितेश राणेंचा इशारा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी

कणकवली : आम्ही आव्हान दिले म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी डिपीडिसीची बैठक लावली आहे. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात होणार नसल्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्र्यांना अडविण्याची आम्हाला हौस नाही, आमचा हा हेतू सुद्धा नाही. मात्र जिल्ह्यातील प्रश्न, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते थांबणार नसतील तर मग त्यांना अडवावेच लागेल, असा इशाराही आ. राणेंनी दिला आहे.

पालकमंत्री हे डीपीडिसीचे मालक नाहीत, ते अध्यक्ष आहेत. डीपीडिसीच्या निधीचे वाटप सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. मात्र डीपीडिसी निधी वाटपात पालकमंत्री राजकारण करत आहेत, असे सांगून डीपीडिसी मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणारच, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी देत पालकमंत्र्यांनी दोनवेळाच्या जेवणाचा डबाही सोबत आणावा, असे म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी राजशिष्टाचार पाळत नाहीत. शासकीय आढावा बैठकीत कोणी बसावे, कोण नाही हे घटनेने सांगितलेले आहे. ते जर पायदळी तुडवत असतील तर खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!