विरण सोसायटी निवडणूकीत
अटीतटीच्या लढतीत भाजपची महाविकास आघाडीवर मात

भाजपा पुरस्कृत शेतकरी समृद्धी पॅनलचे ७ विरुद्ध ६ जागा मिळवून वर्चस्व

मालवण : विरण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत भाजपा आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये अटीतटीची लढत होऊन भाजप पुरस्कृत शेतकरी समुध्दी पॅनलने सोसायटीवर ७ विरुद्ध ६ जागा मिळवीत वर्चस्व मिळवले आहे.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप संस्था म्हणून कार्यक्षेत्र असलेल्या विरण विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी समृद्धी पॅनलचे ७ तर महाविकास आघाडी पुरस्कृत जयकिसान सहकार विकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप प्रणित शेतकरी समृद्धी पॅनलने माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली तर महाविकास आघाडीचे राजाराम उर्फ नाना नेरूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली होती. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राठीवडे, मसदे चुनवरे, मालोंड बेलाचीवाडी, माळगाव, वेरळ आदी गावातील मतदारांनी मतदान केले.

भाजपच्या पॅनल मधून रामदास बाळकृष्ण पांजरी १८०, पंकज सिताराम परब १८०, रघुनाथ आत्माराम परब १७४, विश्वनाथ शिवराम परब १७४, जागृती जितेंद्र परब १९७, अनिल दिगंबर जाधव १९०, रामचंद्र बाबुराव झोरे १८२ तर शिवसेना पुरस्कृत पॅनलमधुन सुरेश अंकुश नेरूरकर २०२, राजाराम अंकुश नेरूरकर १८९, जयेश प्रकाश नार्वेकर १७८, मोहन कृष्णा घाडीगांवकर १७५, भाऊ विश्राम परब १७६, निर्मला गोपिनाथ परब १८८ विजयी झाले. विरण संस्था कार्यालयात झालेल्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर, सहाय्यक अधिकारी अजय हिर्लेकर, शिवप्रसाद चौकेकर, अतुल मालंडकर, राधिका हळदणकर, नम्रता माळकर, विलास सावंत, दाजी सावंत हे उपस्थित होते. तसेच सेक्रेटरी गावडे, विजय घाडीगांवकर, सुभाष परब उपस्थित होते. विजयी भाजप प्रणित शेतकरी समृध्दी पॅनलचे भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!