गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शिवसेनेचा कुडाळात कार्यकर्ता मेळावा

माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे ना. योगेश कदम (राज्यमंत्री – गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन) यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे.

या मेळाव्यास माजी मंत्री आ. दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कुडाळ -मालवण मतदार संघातील शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, (बेसिक, महीला, युवा, युवती, कामगार, ओबीसी सेल) या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!