मालवण : उत्तराखंड येथील हलदवणी या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबोधित केलं. या सभेनंतर त्या जागेत काही उजव्या विचारसरणीच्या समाजकंटकांनी गंगाजल ओतून शुद्धीकरण करत हवन विधी करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. आजही समाजात जातीभेद आणि अस्पृशता पसरवण्याचं जर कामं कुणी करत असतील तर ही बाब खेदजनक असून याचा निषेध म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा फोटो हातात धरून ‘सपोर्ट खर्गे’ या शब्दांचा उल्लेख असेलेले फलक हातात धरून भरडनाका या ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेला समानतेचा हक्क यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजमंदिर या ठिकाणी जाऊन पुतळ्या जवळ जाऊन संविधान वाचत वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल माजी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आप्पा चव्हाण, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस, पराग माणगावकर, केदार केळूसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते