विशाल परब यांचे दमदार प्रायोजन; विनोद राऊळ व ॲड. अनिल निरवडेकर यांचे नियोजन
भाजपा युवा मोर्चाचा सांस्कृतिक उत्सवासाठी पुढाकार; खुला गट, बालगट आणि रील स्पर्धेचीही मेजवानी!
सावंतवाडी : दीपावलीच्या उत्साहात सावंतवाडीकरांना यंदा नरकासुरांच्या भव्य आणि कलात्मक प्रतिकृतींचा अनोखा थरार अनुभवायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या भरीव प्रायोजनातून शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे सावंतवाडीच्या दीपोत्सवात सांस्कृतिक रंगत आणि स्पर्धात्मक उत्साहाची भर पडणार आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद राऊळ व सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या कल्पक नियोजनातून हा उपक्रम साकारत आहे. मोती तलाव परिसरातील अमूल आईस्क्रीमसमोरील कॉर्नरवर, शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ ही स्पर्धा रंगणार आहे.
खुला गट, बालगटासह रील स्पर्धेचीही धूम!
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभाग केवळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. खुला गट आणि बालगट अशा दोन स्वतंत्र विभागांत स्पर्धा होणार आहे. नरकासुरांच्या आकर्षक आणि महाकाय प्रतिकृतींच्या माध्यमातून स्पर्धकांची कलात्मकता, कल्पकता, रंगसंगती आणि सांघिक मेहनतीचे दर्शन घडणार आहे.
पारंपरिक नरकासुर स्पर्धेला आधुनिक डिजिटल माध्यमांची जोड देत स्वतंत्र रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानातील कलाविष्कारासोबतच सोशल मीडियावरही या उत्सवाची रंगत पाहायला मिळणार आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांनी दिली.
क्रीडा, आरोग्य आणि संस्कृतीचा भाजपाकडून त्रिवेणी संगम!
युवकांच्या कलागुणांना आणि ऊर्जेला विधायक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भाजपाकडून सावंतवाडीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तीन दिवसांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून व्यायाम आणि सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर आता नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जागर करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहन, आरोग्याविषयी जागरूकता आणि स्थानिक कलासंस्कृतीचे संवर्धन अशा तीन महत्त्वपूर्ण बाबींचा संगम या उपक्रमांतून साधला जात आहे. विशाल परब यांच्या प्रायोजनामुळे स्थानिक युवकांना आपले कलागुण सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
सावंतवाडीकरांनो, नरकासुर स्पर्धेच्या जल्लोषासाठी सज्ज व्हा!
दीपावलीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याला सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीइच्छुक स्पर्धकांनी शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हितेन नाईक – भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष : 8291494897 पंकज तुळसुलकर : 9130683472 या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
यंदा सावंतवाडीत आरोग्याचा संकल्प, क्रीडाशक्तीचा हुंकार आणि संस्कृतीचा दिमाखदार जागर अनुभवायला मिळणार आहे. नरकासुरांच्या भव्य प्रतिकृती, युवकांचा उत्साह आणि बालकलाकारांचा सहभाग यामुळे सावंतवाडीचा दीपावली उत्सव निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.





Subscribe to my channel




