देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे उद्या १३ ऑगस्टला उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण; मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार

देवगड : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणार आहे.देवगड शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या नव्या गुरांच्या कोंडवाड्यामुळे शहरातील मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

मोकाट गुरांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या समस्यांवरही यामुळे नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवगड भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ आणि शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!