चिपळूण | वालावलकर रुग्णालयातर्फे १३ व १४ जूनला लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील मुलांसाठी शिबिराचे आयोजन : मुंबईतील नामवंत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांची उपस्थिती

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १३ व १४ जून रोजी लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मुलांसाठी खास करुन हे शिबीर भरवण्यात आले आहे. या शिबिरासाठी मुंबईतील प्रतिष्ठित बालरोग शल्य चिकित्सक डॉ. पारस कोठारी हे उपलब्ध असणार आहेत.

डॉ. कोठारी हे सायन रुग्णालय येथे बालरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लहान मुलांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया, जन्मत: असलेल्या आजारावरील उपचार, नवजात बाळांच्या शस्त्रक्रिया आणि गुंतागुंतीच्या जन्मदोषांचे व्यवस्थापन (जन्मजात विकृती), हर्निया, अपेंडिक्स, गाठी व सूज काढण्याची शस्त्रक्रिया, लघवी त्रासावरील उपचार यासारख्या विविध शस्त्रक्रिया करण्यात डॉ. कोठारी हे पारंगत आहेत. तरी या शस्त्रक्रिया शिबिराचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नोंदणीसाठी सचिन धुमाळ ९२७२८९७८३४, संकेत जांभळे यांच्याकडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!