सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहून मार्गदर्शन : शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र
मालवण : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे विज्ञान दिनानिमित्त अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) श्री. दिनेश जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत सॉफ्टवेअर डेव्हलपर चिन्मय पाटकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित या सत्रात AI ची संकल्पना, त्याचे उपयोग आणि भविष्यातील संधी याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. तसेच सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या ३ तासांच्या विचारमंथन व प्रशिक्षण सत्रात श्री. दिनेश जाधव यांच्यासह सॉफ्टवेअर डेव्हलपर्स चिन्मय पाटकर आणि चित्रांगी मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणात शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शैक्षणिक क्षेत्रातील व्यावहारिक उपयोग, अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी AI साधनांचा वापर कसा करावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत समावेश कसा करावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही नव्या तंत्रज्ञानाची ओळख झाली असून कार्यक्रमाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.