रत्नागिरीचे न्यायमूर्ती व्ही.वाय.जाधव व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्याहस्ते पत्रिका पुजन
३ एप्रिल पासून धर्मसंकीर्तन महोत्सव, भजनसेवेस तर ४ एप्रिल पासून श्री गुरूलिलामृत सामुदायिक पारायण सेवेस होणार प्रारंभ
अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४८ वा पुण्यतिथी महोत्सव १५ एप्रिल रोजी मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व रत्नागिरीचे न्यायमूर्ती व्ही.वाय.जाधव यांच्याहस्ते पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात श्रींच्या चरणी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे पुरोहित मोहन महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, कोल्हापूरचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, स्वामी भक्त सुहास पाटील, ओंकार पाठक, खाजप्पा झंपले, डॉ.हिरण्णा पाटील, प्रा.शिवशरणअचलेर, शिवाजीराव घाटगे आदींसह उपस्थित मान्यवरांना कार्यक्रम पत्रिका प्रदान करण्यात आल्या. यावेळी अमर पाटील, प्रसाद पाटील, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, चंद्रकांत कवटगी, रमेश शिंदे सर, सुनिल पवार, मनोज इंगुले आदींसह अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.