
आमदार निलेश राणेंकडून परब कुटुंबीयांचे सांत्वन
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कै. सरोज परब यांच्या निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी मसुरे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी परब कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.
कै. सरोज परब यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे यांनी सरोज परब यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले.
“सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणूस गमावला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी होती. परब कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ कुटुंबीयांना मिळो,” असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
आमदार राणे यांनी कै. सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी तथा मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुलगा राहुल परब यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवसेना संपर्कप्रमुख राजेश गावकर, अशोक बागवे, पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, गणेश परब, वैभव येसजी, अनिल सावंत, प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते.







Subscribe to my channel






