विजेत्यांना पैठणी तसेच इतर आकर्षक पारितोषिके ; १२ वर्षांखालील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा


मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची खुली नारळ लढवणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी, तृतीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. खास आकर्षण म्हणून सुरेल बँजो पार्टी यांचे वादन होणार आहे. तसेच लकी ड्रॉ असणार आहे. यावेळी १२ वर्षांखालील मुले-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा नारळी पौर्णिमा (कोळी) या थीमवर होणार आहे, अशी माहिती शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख निना मुंबरकर यांनी दिली.
शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबरकर बोलत होत्या. यावेळी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेथर, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे खान, उपतालुकाप्रमुख युवतीसेना रूपा कुडाळकर, लक्ष्मी पेडणेकर, राधिका मोंडकर, मंदा जोशी, कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या सोनाली डीचवलकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, दत्ता पोईपकर, मडये आदी उपस्थित होते.
नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा २०२५ आणि लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा (१२ वर्षांपर्यंत) याचे उद्घाटन दुपारी ३ वाजता माजी आमदार वैभव विजय नाईक आणि परशुराम उपरकर, तसेच माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध वकील उल्हास कुळकर्णी, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भाग्यश्री लाकडे ९२०९१४५९३९, विद्या फर्नांडीस, नीना मुंबरकर, रुपा कुडाळकर यांच्याशी संपर्क साधावा.

Subscribe to my channel




