पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


मालवण : येथील ना.अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता व बँकिंग माहिती याबाबत गणेश नागरी पतसंस्था सभागृहात नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री गणेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून टोपीवाला ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) च्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग साक्षरता कार्यशाळा पार पडली. व्यवसाय अभ्यासक्रम विभाग व श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बँक व्यवहारा बाबत सर्वसाधारण माहिती, तेथे वापरण्यात येणारी देव – घेव चलने इत्यादी माहिती प्रशिक्षणात देण्यात आली. श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांनी संस्थेचे जमा खर्च, वार्षिक अहवाल यातील महत्त्वाच्या बाबी याची सविस्तर माहिती प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवून विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावरील संस्थेची स्थापना कशा पद्धतीने होते, तिचा कारभार कसा चालतो, याबाबती सुद्धा सर्व माहिती सौ. सुचिता धुरी यांनी विद्यार्थ्यांना दिली. संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुप्रिया गावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार व सूत्रसंचालन व्यवसाय अभ्यासक्रम प्रमुख श्री. जाधव सर यांनी केले. यावेळी टोपीवाला ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाचे अकरावी व बारावीचे एकूण ३५ विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम श्री गणेश नागरी पतसंस्था कार्यालयात पार पडला.
















Subscribe to my channel




