बूथ क्र. १५१ वर पंतप्रधान मोदींच्या विचारांचा जागर; संघटनात्मक कामकाज व आगामी उपक्रमांवरही चर्चा
सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीतील बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक श्रवण केले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध क्षेत्रांतील सकारात्मक उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या प्रेरणादायी कार्यावर व्यक्त केलेले विचार यावेळी उपस्थितांनी जाणून घेतले.
या कार्यक्रमाला सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बूथ अध्यक्ष सचिन माडये, माजी बूथ अध्यक्ष भूषण नाईक, स्वप्नील जाधव, बाबूराव तेली तसेच अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण केले.
कार्यक्रमानंतर विशाल परब यांच्या उपस्थितीत बूथ पातळीवरील संघटनात्मक कामकाज, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. बूथ संघटन अधिक सक्रिय करण्यासह पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला.