मालवणात गणेश विसर्जन व्यवस्थेकडे नगरपालिकेचा कानाडोळा ; हरी खोबरेकर, कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाची तत्परता

समुद्रात गणेश विसर्जनासाठी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते किनारपट्टीवर सज्ज

पक्षीय मतभेद विसरून भाजप जिल्हा उपाध्यक्षांकडून कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर आणि परिसरात दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. यंदाच्या वादळी वातावरणामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जन करणे भाविकांसाठी एक मोठे आव्हान बनले होते. अशा परिस्थितीत भाविकांना कोणताही धोका होऊ नये आणि त्यांचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि कै. आतू फर्नांडिस मित्रमंडळाने मालवणच्या किनाऱ्यावर एक विशेष पथक कार्यरत ठेवत गणपती मूर्तीचे मोफत आणि सुरक्षित विसर्जन केले. एकीकडे मालवण पालिका प्रशासनाने गणेश मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्या कडे कानाडोळा केला असताना हरी खोबरेकर, कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील तत्परता दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

यावर्षी गणेशोत्सव सुरू असतानाच समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाली. उंच लाटा आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भाविकांना समुद्रात उतरून विसर्जन करणे धोकादायक होते. हे लक्षात घेऊन हरी खोबरेकर मित्रमंडळाने तरुणांची दरवर्षी प्रमाणे एक टीम तयार केली. ज्यांनी स्वतःची सुरक्षा जपून भाविकांनी आणलेल्या गणेश मूर्ती समुद्रात सुरक्षितपणे विसर्जित केल्या. या पथकाने कोणतेही शुल्क न घेता निःस्वार्थ भावनेने सेवा दिली. ज्यामुळे शेकडो गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. हरी खोबरेकर मित्रमंडळ गणपती विसर्जनासाठी अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. यावर्षीच्या पथकात सोमनाथ लांबोर, भावेश बटाव, ऋतिक बटाव, दीपक कदम, निखिल बटाव, प्रथमेश परब, संचित देसाई, एंजल फर्नांडिस, विल्सन परेरा, तेजस घारकर, आशिष फर्नांडिस, गणेश राणे, सोहम हिंदळेकर, प्रणव कदम, यश देसाई, संदीप देसाई, धनंजय साळगावकर, योगेश साळगावकर, अण्णा कदम, कार्तिक बटाव, तन्मय यमकर, रोशन कांबळी, भाविक देसाई, सागर झोरे, विकी लवंदे, साहिल लवंदे, संदेश झोरे, शुभम खरात, जॅकी परेरा, रॅक्स परेरा, तन्मय राणे, बबन वाघ, परेश वाघ, सागर झोरे, साई डोईफोडे, कार्तिक बटाव, शंकर बटाव, राजा बटाव, अमित आडवलकर, रोहित सकपाळ, मनीष शिंदे, श्रेयस लांबोर यांसारख्या अनेक तरुणांचा सहभाग होता. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गणपती विसर्जनाचा सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

भाजप जिल्हा उपाध्यक्षांकडून हरी खोबरेकर मित्रमंडळाचे कौतुक 

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पुढाकार घेत गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पक्षीय मतभेद विसरून कौतुक केले आहे. “कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी याचे नियोजन प्रशासनामार्फत दरवर्षी केले जाते. दरवर्षी मी स्व तः मालवण नगरपालिकेचे नियोजन किंवा पोलीस यंत्रणा मार्फत नियोजन दक्षता समिती मीटिंगमध्ये सभेमध्ये दरवेळी गणपतीच्या पाचव्या, सातव्या व अकराव्या दिवशी गणेश विसर्जनाला मालवण बंदर जेटी येथे गणेश विसर्जनाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सातत्याने करत होतो. शासनाकडे आपत्कालीन विभाग आहे त्याच्या मार्फत सोय करण्यात यावी अशी सूचना केली होती. सभेच्या वेळी सर्वांनीच होय म्हणून सांगितल. मालवण बंदर जेटीवरती गणेश विसर्जनाची मोठी गर्दी असते. कोकणातला गरीबातला गरीब व्यक्ती पण थाटामाटात गणपतीचे मनःपूर्वक श्रद्धेने पूजन करत असतो. गणपती विसर्जनाच्या वेळी बऱ्याच वेळा मोठी अडचण होते तो गणपती गाडीवरून खाली उचलणे व त्याचे समुद्रामध्ये विसर्जन करणे. ही मोठी जबाबदारी असते .

सर्वांनाच पोहता येत नसते त्यामुळे मोठा गणपती समुद्रामध्ये भरतीच्या वेळी कसा न्यायचा हा मोठा प्रश्न असतो. मागील गणेश उत्सवाच्या वेळी विसर्जनाच्या वेळी गणपती समुद्रात नेऊन विसर्जन कसा करावा यासाठी तासंतास उभे राहणारे भावीक मी पाहिले होते. म्हणून मी आग्रहाची मागणी मालवण नगरपालिकेच्या गणेश चतुर्थी नियोजनाच्या सभेमध्ये केली होती. नगरपालिकेने याच्याकडे सोईस्करपणे काना डोळा केला. यावर्षीचे मालवण नगरपालिकेचे नियोजन फक्त कागदावरच राहिले. यावर्षी हरी खोबरेकर मित्रमंडळाने गणपती विसर्जनाची सोय मोफत उपलब्ध करून दिली होती. सर्व तरुण आदरपूर्वक हसतमुख सर्वांचे स्वागत करून गणपती गाडीवरून खाली उतरवून त्याचे खोल समुद्रात विसर्जन हसतमुखाने करताना पाहावयास मिळाले. खूप आनंद वाटला. जरी हरी खोबरेकर आमचे विरोधक असले तरी सामाजिक कामाचा गौरव करणे क्रमप्राप्त आहे. विसर्जन करणारे सर्व तरुण हे सायंकाळी पाच वाजल्यापासून भिजलेल्या अवस्थेमध्ये तसेच विसर्जन करत होते. आपल्या कार्यास मानाचा मुजरा…”, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!