मंत्री नितेश राणेंचा सत्कार सोहळा उद्या ऐवजी रविवारी…

संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल नितेश राणेंचा रविवारी ९ नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे जाहीर झाला आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने रविवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह जिल्हा पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री राणे यांचा नागरी सत्कार शनिवार ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र अपरिहार्य कारणामुळे पालकमंत्री राणेंचा नागरी सत्कार समारंभ रविवार ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा संघटक अंकुश जाधव यांनी दिली.

error: Content is protected !!