
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते संजय दत्त यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ; वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण
कणकवली : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस उद्या शुक्रवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता साजरा केला जात आहे. यानिमित्त पुढील वर्षीच्या वाढदिवसापर्यंत त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला जाणार असून उद्याच्या वाढदिवस सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते संजय दत्त यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या वाढदिवस सोहळ्या निमित्ताने प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट ची मेजवानी रसिकांना उपलब्ध होणार असून राणे साहेबांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुभारंभ सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यात अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अभिनेते संजय दत्त यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा उहापोह होणार आहे. कोकणाच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समितीकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, हा सोहळा सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील एक लक्षवेधी क्षण ठरणार आहे.



Subscribe to my channel




