‘युथ, क्राईम अँड जस्टीस’मधून तरुणाई, गुन्हेगारी अन् न्यायव्यवस्थेचा अभ्यासपूर्ण वेध

ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन; विद्यार्थी, संशोधक आणि कायदे अभ्यासकांसाठी ठरणार उपयुक्त

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘Youth, Crime and Justice : Maharashtra and Madhya Pradesh’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. कृपादृष्टी पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला ISBN 978-81-69896-50-4 हा आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक प्राप्त झाला आहे.

तरुणाई, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या परस्परांशी निगडित असलेल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयांचा या पुस्तकातून सखोल अभ्यास करण्यात आला आहे. युवकांमध्ये वाढणाऱ्या विविध सामाजिक व कायदेविषयक प्रश्नांसह गुन्हेगारीचे स्वरूप, त्यामागील सामाजिक घटक आणि न्यायव्यवस्थेची भूमिका यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

कायदा आणि सामाजिक प्रश्नांकडे केवळ कायदेविषयक नव्हे, तर व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या संदर्भातून विषयाचा अभ्यास केल्याने या पुस्तकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विद्यार्थी, संशोधक, कायदे अभ्यासक, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. युवक, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी या पुस्तकातून अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले या कायदेविषयक अभ्यासक व संशोधक असून शिक्षण क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहेत. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या या संशोधनपर लेखनातून युवक, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या महत्त्वपूर्ण विषयांकडे व्यापक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या या साहित्यिक व संशोधनपर योगदानाबद्दल शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!