एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; राज ठाकरेंना चांगल्या बातमीची अपेक्षा

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन

मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असून, येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

५ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री पूर्णपणे सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नोकरीसाठी घरदार आणि कुटुंबापासून दूर राहून संघर्ष करणाऱ्या तरुण-तरुणींची परिस्थिती मनाला वेदना देणारी असल्याचे सांगत, त्यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!