मालवणी बझारच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड

मालवण : मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या धोरणात्मक, विकासात्मक व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी मालवण शहरातील संस्थेची मालकीची असलेली ८ हजार चौरस फुट प्रशस्त जागा जमिनीत बहुउद्देशीय विकासात्मक डेव्हलपमेंट करून संस्थेला आर्थिक स्थिरतेकडे नेऊन प्रगती करण्यात येणार असल्याचे श्री. तळवडेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

यावेळी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी सहकार खात्याचे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेच्या प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे व संस्थेचा विकास करण्यासाठी निवडणूक अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांना अभिवचन देवून नूतन अध्यक्षाना शुभेच्छा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परब यांनी शुभेच्छा देऊन कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल असे सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, उपाध्यक्ष मारूती सोनवडेकर, संचालक प्रमोद मोहिते, प्रताप बागवे, सुरज गवंडी, विनोद सातार्डेकर, मंगेश परब, हनुमंत प्रभू, प्रशांत पारकर, विठ्ठल मालंडकर, रूपेश खोबरेकर, हेमंत तळवडेकर, सुप्रिया गांवकर, जयश्री हडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परब व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!