महेश इंगळे यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कांदे कुटुंबीयांकडून स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा

कुडाळ : अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या कुडाळ – नाबरवाडी येथील “स्वामी सदन” निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कांदे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे औक्षण करून त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी त्यांचा स्वामी समर्थांची प्रतिमा, शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अक्कलकोट येथील मंदिराचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, देवगड हडपीठ मठाचे नंदकुमार पेडणेकर यांच्या सह १०० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. यावेळी श्री. इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथन आणि मार्गदर्शन करत आशीर्वाद दिले. स्वामींच्या नामस्मरणात आणि जयघोषांत हा सोहळा पार पडला. यावेळी स्वामीभक्त सदानंद कांदे, सागर कांदे, अनिश सावंत, राजेश मांजरेकर, नितीन सोलकर, सचिन कुडतरकर, बापू सावंत, मयूर कुडतरकर, जितू राणे, विलास रुद्रे, स्वरूप सावंत, सागर मठकर, प्रथमेश वर्दम, पप्पू शिरसाठ, कौस्तुभ कुडतरकर, बनी तळवलकर, शशांक पिंगुळकर, अविनाश पाटील, अभय म्हापसेकर, सौ.वनिता जाधव, श्री. कुणकावळेकर यांच्यासह असंख्य स्वामीभक्त सहभागी झाले होते.

error: Content is protected !!