माजी विद्यार्थी संघटना व हितचिंतक पुरस्कृत पॅनेलचा ९ विरूद्ध २ फरकाने पराभव
मालवण : मालवण शहरात गेले काही दिवस प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळ विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणकीत डॉ. किरण ठाकुर व साईनाथ चव्हाण पुरस्कृत शिक्षण उन्नती पॅनेलने ९ विरुद्ध २ अशा फरकाने एकतर्फी यश मिळवले आहे. या पॅनलने माजी विद्यार्थी संघटना व हितचिंतक पुरस्कृत पॅनेलचा पराभव केला. या निवडणुकीत शिक्षण उन्नती पॅनेलचे अध्यक्ष पदाचे उमदेवार डॉ. किरण ठाकुर व कार्याध्यक्ष पदाचे उमेदवार साईनाथ चव्हाण हे बिनविरोध निश्चित झाले आहेत. तर रविवारी ९ जागां साठी झालेल्या निवडणुकीत शिक्षण उन्नती पॅनेलचे ७ तर माजी विद्यार्थी संघटना पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले.
या निवडणकीत ५२४ मतदारांपैकी २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील कन्याशाळेत मतदान व मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते ५ या वेळात मतदान शांततेत पार पडले. संध्याकाळी मतमोजणी घेण्यात आली. पहिल्यांदा सदस्य पदाची मतमोजणी झाल्यानंतर वैयक्तिक पदाची मतमोजणी घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालाची अधिकृत घोषणा १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण समेत करण्यात येणार आहे.
निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे – कार्यवाह – चंद्रशेखर उर्फ गणेश रजनीकांत कुशे (१६२ विजयी), सुरेश मधुकर परब (१३०) या विभागात २९६ मतदान झाले यात ४ मते बाद ठरली होती. सहकार्यवाह संदेश रामचंद्र कोयंडे (१४८ विजयी), विजय प्रताप केनवडेकर (१४३). या विभागात २९६ मतदान झाले होते. यात ५ मते बाद ठरली होती. कोषाध्यक्ष नंदन सिताराम देसाई (१६९ विजयी), विठ्ठल बाबू पटकारे (१२४). या विभागात २९६ मतदान झाले होते. यात ३ मते बाद ठरली होती. सदस्य पदासाठी रामचंद्र नानासाहेब काटकर (१४३ विजयी), राजेंद्र देविदास खांडाळेकर (१५० विजयी), अॅङ समीर सुरेश गवाणकर (१६७ विजयी), डॉ. शशिकांत जगजीवन झांटये (१५५ विजयी), महादेव सत्यवान पाटकर (१४० विजयी), शैलेश सुरेश पावसकर (१४७ विजयी), महेश अंधारी (१२०), प्रमोद ओरसकर (१३७), महेश काळसेकर (१२८), दीपक पाटकर (१३७), नितीन वाळके (१२६), अंजली हडकर (११०). या विभागात २९६ मतदान झाले होते, यात १४ मते बाद झाली होती. निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवप्रसाद चौकेकर, केंद्राध्यक्ष अतुल मालंडकर, मतदान अधिकारी राधीका हळदणकर, नम्रता साळकर, सान्वी शेट्ये, राजाराम कांदळगावकर, गंगाराम सावंत यांनी काम पाहिले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विद्यमान पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला. विजयी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पॅनेलने अकरा जागांपैकी नऊ जागांवर विजय संपादन केला आहे. विद्यामन अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर आणि साईनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय संपादन करण्यात आल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली.















