

१ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषकाचे पारितोषिक ; तर उपविजेत्या गौरव बामजी याला ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक
राज्यातील सर्वाधिक रोख पारितोषिक असलेल्या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, सिंधुदुर्ग येथील तब्बल ३२ संघ सहभागी
मालवण : येथील सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात गौरव बामजी यांना नमवित शैलेश नाईक महाविजेता ठरला. राज्यातील सर्वाधिक रोख पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण सिंधुदुर्ग या ठिकाणाहून आलेले तब्बल ३२ संघ सहभागी झाले होते.

आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांचा सतीश आचरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दिपक पाटकर, अशोक सावंत, बाबा परब, पंकज सादये, बबन शिंदे यांचे मंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व दरवर्षी ही स्पर्धा व्हावी असे सांगितले. या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. हे सामने दोन गटामध्ये खेळविण्यात आले. दोन्ही गटातील सामने रोमहर्षक व अतितटीचे झाले. या स्पर्धेमध्ये शैलेश नाईक यांनी आपले एकहाती वर्चस्व गाजविले. अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावित १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले. तर अलिबाग येथीलच गौरव बामजी यांनी द्वितीय क्रमांक पटकावित ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, मुंबई येथील आसीफ खुरेशी तृतीय क्रमांक १५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तर आसीफ खुरेशी यांच्या ब संघाने चतुर्थ क्रमांक ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक पटकाविले. तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून शैलेश नाईक यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. उत्कृष्ट प्रहार अलिबाग येथील पंकज रांजणकर याला आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या वतीने गौरविण्यात आले.

यावेळी सतीश आचरेकर यांनी सांगितले की, सलग ९ वर्षे ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. काही कारणास्तव मधली तीन वर्षे मला ही स्पर्धा घेता आली नव्हती परंतु रॉयल ब्रदर्स या मंडळाने गेली ३ वर्षे ही स्पर्धा सुरु ठेवली. त्यानंतर यावर्षी महाराष्ट्रातील पहिलीच एवढ्या रकमेची ही स्पर्धा आपल्या मालवणमध्ये भरविण्याचे ठरविले आणि आज ही स्पर्धा सत्यात उतरली आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी आपली स्पर्धा असेच समजून काम करत असल्याने ही स्पर्धा कोणतेही गालबोट न लागता यशस्वी होत आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय तुल्यबळ असे संघ सहभागी झाले असल्याने या स्पर्धेला एक वेगळी रंगत निर्माण झाली होती. या स्पर्धेसाठी रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, तुषार मसुरकर व निलेश वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगत विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी निलेश वेर्णेकर, संजय घरत, सागर तिगडी, मनोज मयेकर, बुवा तारी, निशाद हिरनाईक, प्रसाद घरत, मॉन्टी तारी, बाबा जोशी, विकी चोपडेकर, आशिष नार्वेकर, संजय सारंग, प्रसाद घरत, विपुल राऊळ, शैलेश नाईक, मोहन म्हात्रे, शंकर अण्णा घरत, नितेश हडकर, गुणेश हडकर, रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ यांचा सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, तुषार मसुरकर, बाबल नहोना, दर्पण सादये, कुलराज बांदेकर, रॉनी फर्नांडीस, राज जाधव, हर्ष मिठबावकर, ओंकार यादव, शुभम मिठबावकर, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, कल्पेश मसुरकर, विश्वास आचरेकर, मंदा अंधारी, रोहित जोशी, रेघन नहोना, भावेश पारकर, आदिनाथ खुरंदळे, ध्रुव आचरेकर, फ्रान्सिस नहोना व इतर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन सातारा येथील डॉ. भाग्यश्री शिंदे व अक्षय मालवणकर यांनी केले.



Subscribe to my channel




