हर्षदा पेंडूरकर ठरल्या उपविजेत्या ; तर दीपा पवार व मौसमी जाधव अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी


मालवण : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे सलग ११ व्या वर्षी मालवण जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत लतिका लुडबे यांनी विजेतेपद पटकावत सोन्या-चांदीने मढवलेला मानाचा श्रीफळ चषक मिळवला. या स्पर्धेत हर्षदा पेंडूरकर यांनीउपविजेतेपद पटकावले, तर दीपा पवार तृतीय आणि मौसमी जाधव उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेला स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, यशराज प्रेरणा, कोकण वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग आणि सेवते प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले होते.



या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांचा शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, राजू परुळेकर, बबन शिंदे, विश्वास गावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना, शिल्पा खोत मित्रमंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा सर्वात जुनी आणि सर्वाधिक गर्दी जमवणारी स्पर्धा असल्याचे म्हटले. तसेच, हिंदूंचे सण अशाच प्रकारे मोठ्या थाटात साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या लतिका लुडबे यांना भाजपचे अशोक सावंत, भाई परुळेकर, मंदार केणी, भाई कासवकर, शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सोन्या-चांदीने मढवलेला श्रीफळ चषक, सोन्याची नथ, सोन्याचे नाणे आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या हर्षदा पेंडूरकर यांना महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, तारका चव्हाण, नमिता गावकर आणि सौ. प्रभाळे यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या दीपा पवार यांना करुणा जळवी आणि समस्त स्वराज्य, यशराज प्रेरणा, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, तसेच शिल्पा यतीन खोत यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून निवड झालेल्या मौसमी जाधव यांना चांदीच्या भेटवस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमात लहान मुलांसाठीही नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशांत हरिश्चंद्र पेंडूरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा वसंत कांदळगावकर द्वितीय आणि रोहन संतोष गोवेकर तृतीय क्रमांकावर राहिले. या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
यावेळी शिल्पा खोत मित्रमंडळातर्फे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये पारंपरिक वादक लक्ष्मण मालवणकर, बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते पंकज गावडे, ब्लड बँक सिंधुदुर्गचे रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले, मालवणचे नंदकुमार आडकर, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गचे ओमकार लाड, डॉ. प्रसाद धमक, श्री. चिऊळकर, सिद्धेश ठाकूर, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, दर्शन वेंगुर्लेकर आणि व्यावसायिक अनिता आळवे यांचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान स्वराज्य ढोल ताशा पथकाने ‘महाकाल’ या संकल्पनेवर आधारित ढोल वादनाचे सादरीकरण केले. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेला मंदार सरजोशी, नितीन तोडणकर, दिलीप पवार, अमन गोडावले, श्रीकांत मालवणकर, मुन्ना हरचकर, गजानन मांजरेकर, मिथिल मोर्वेकर, राहुल जाधव, तेजस पोळ, योगेश पांचाळ, दादा वेंगुर्लेकर, दिक्षा लुडबे, मिताली कोरगावकर, करुणा जळवी, मे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कुडाळ, मे. जगनाथ गंगाराम पेडणेकर कुडाळ, अण्णा कारेकर ज्वेलर्स मालवण, मे. चंद्रवदन कुडाळकर ज्वेलर्स मालवण, माझी इरकल ठाणे, मालवण व्यापारी संघ, मातृत्व आधार संघटना यांचे विशेष सहकार्य लाभले.

Subscribe to my channel




