मालवण : डीएड कॉलेज मालवण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डीएड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. रमेश वळवी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. नितीन राणे, बार्टीचे समतादूत संग्राम कासले तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी प्राध्यापक आनंदी घोगळे व बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थी मधुरा धुरत, प्रतिक्षा सुर्वे, खुषी सावंत, शीला वलकर, यशश्री वरक यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू बंगे तर आभार उत्कर्षा चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.