मेढा येथील नागरिकांचा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन मालवण शहर मेढा शंकर मंदिर परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, ममता वराडकर, राजन परुळेकर, सहदेव बापार्डेकर, जगदीश गांवकर, संदेश चव्हाण, यशवंत गांवकर, प्रसाद आडवणकर, मोहन वराडकर, विशाल आचरेकर यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

मेढा शंकर मंदिर येथील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये यश तारी, चंदू सरकारे, सिद्धेश मलये, जॉन्टी तारी, गीतेश ढवळे, राजू डिंगणकर, बाबा मुकादम, मोसीम शेख, सुशांत कोचरेकर, किरण जोशी, तुकाराम तारी, चंदू आचरेकर, हरेश गोवेकर, सलमान मुकादम यांनी प्रवेश केला.

error: Content is protected !!