कणकवलीचा पराभव जिव्हारी लागलेल्या मंत्री नितेश राणेंचं सूचक ट्विट
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व कट्टर राणे समर्थक समीर नलावडे यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या मंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीत आपल्या निदर्शनास आलेल्या काही गोष्टी पक्ष नेतृत्व व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट करत मंत्री नितेश राणे यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
या पोस्ट मध्ये मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे की, “गप्प होतो … पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे !” या पोस्ट मुळे नितेश राणे कोणत्या गोष्टीचा खुलासा करणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.