वराड कुसरवे मठात प.पू. राणे महाराजांचा ९४ वा जयंती उत्सव
१३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
प. पू. राणे महाराज यांचा ९४ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. हरिपाठ व रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. दिंडी भजन ( आकारीदेव ब्राह्मण भजन मंडळ, चिंदर), रात्री ९ वा. शिवरामेश्वर भजन मंडळ, आचराचे भजन होईल. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. हरिपाठ, सकाळी १० ते १२ वा. रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ९ वा. स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. १५ रोजी राणे महाराजांचा ९४ वा जयंती उत्सव होणार संपन्न होणार आहे. सकाळी ८ वा. लघुरुद्र व पादुका पूजन, १० वा. बुवा संदेश सामंत, झाराप यांचा भक्तिगीत गायन कार्यक्रम, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद (अखंड सुरू ), २ वा. प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळींचा हरिपाठ व भजन, सायंकाळी ४ वा. पालखी सोहळा (कै. गुरुनाथ म्हाडगूत, कट्टा यांचे घर ते राणे महाराज मठ), सायंकाळी ६ वा. गोफनृत्य ( महापुरुष भजन मंडळ, त्रिंबक), ७ ते १० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे ‘शनी – मारुती युद्ध’ नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट, कुसरवेवाडी, वराड (कट्टा) यांनी केले आहे.