बूथपातळीवर संघटन मजबूत करण्यासह शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
बूथपातळीपासून संघटन मजबूत करण्यावर भर देत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक आहे, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.