सिंधुदुर्गात २९ ठिकाणी पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य
कुडाळ मधील १०, कणकवली मधील १३ तर मालवण तालुक्यातील ६ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांचा समावेश
अयोग्य पाणी नमुने आलेल्या ग्रामपंचायतींना सोर्सचे शुद्धीकरण करून फेरनमुने पाठवण्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): जिल्ह्यातील 5 हजार 941 पिण्याच्या पाण्याच्या सर्वजनिक सोर्सची फिस्ट किटच्या सहाय्याने जैविक तपासणी केली असता जिल्हयातील 29 पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक सोर्सचे नमुने अयोग्य आले आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 10, कणकवली तालुक्यातील 13 व मालवण तालुक्यातील 6 सोर्सचा समावेश आहे. अयोग्य पाणी नमुने आलेल्या ग्रामपंचायतीना त्या सोर्सचे शुध्दीकरण करुन पाणी नमुने प्रयोगशाळेस पाठविण्याबाबत सुचित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकुण 5 हजार 941 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे 3 हजार 705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन नुकतेच जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील 85 महसुल गावातील एकुण 989 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्स, दोडामार्ग तालुक्यातील 55 महसुल गावातील एकुण 290 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्स, देवगड तालुक्यातील 97 महसुल गावातील एकुण 502 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्स पैकी 465 सोर्सची तपासणी करण्यात आली. उर्वरित 37 सोर्स हे बंद आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील 83 महसुल गावातील एकुण 395 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्स, वैभववाडी तालुक्यातील 58 महसुल गावातील एकुण 361 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्स ची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकही नमुना पिण्यास अयोग्य आलेला नाही.
कुडाळ तालुक्यातील 122 महसुल गावातील एकुण 1 हजार 158 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्सची तपासणी करण्यात आली त्यापैकी 10 नमुने हे पिण्यास अयोग्य आले आहेत. कणकवली तालुक्यातील 106 महसुल गावातील एकुण 1 हजार 226 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 13 पाणी नमुने हे पिण्यास अयोग्य आले आहेत. मालवण तालुक्यातील 135 महसुल गावातील एकुण 1 हजार 20 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सोर्सची तपासणी करण्यात आली त्यापैकी 6 नमुने हे पिण्यास अयोग्य आले आहेत.
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व सुरक्षित पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या (फिल्ड टेस्ट किटच्या ) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येत आहे. याकरिता प्रती महसुल गावातील पाच महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. प्रशिक्षित झालेल्या महिलांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सोर्सचे एकाच दिवशी फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातुन तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर यांनी दिली आहे.